Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाचा अर्थ अजूनही मला कळलाच नाही।कारण प्रेमात प

 प्रेमाचा अर्थ अजूनही मला कळलाच नाही।कारण प्रेमात पडणे मला कधी जमलेच नाही।आता जमले नाही की मी जमवून घेतलेच नाही हे मात्र मला कळत नाही।
पण जे आता वाटत आहे ती फक्त मैत्री आहे की अजून काही  ,  काही  उमजत नाही। मित्रांना विचारण्याचा प्रश्नच नाही कारण त्यांच्या कडून थट्टेशिवाय बाकी काहीच अपेक्षित नाही।
तुला पाहताच झालेला आनंद,तू न आल्याचे पाहून कासावीस झालेला जीव,तुला लिहून खोडलेला मेसेज, आठवणीने पाहिलेले तुझे स्टेटस,तुझ्या स्टेटस मध्ये स्वतःला पाहून झालेला आनंद,एकत्र काढलेल्या आपल्या फोटोत तू आणि मी किती जवळ आहोत हे पाहतांना आलेले हसु आणि तुझा तो स्पर्श । यालाच प्रेम म्हणतात का ? का ही फक्त मैत्री ? का हे फक्त आकर्षण तर नाही, असा नेहमी पडणारा मला प्रश्न।सारे काही आठवले आज मला। पण नेमके आजच का ?? 
आजची तारीख ?? हो हे फक्त मलाच स्मरणात राहू शकणार। आजचाच तो दिवस याच दिवशी ,एक वर्षा अगोदर तू माझ्याशी प्रथम बोलण्यास सुरुवात केली। आता हीच गोष्ट पहा न मी तारीख मुद्दाम लक्ष्यात ठेवली नाही , ती आपसूक मनात घर करून गेली। कॉलेज च्या पहिल्या दिवसापासून तुझा माझा संबंध नव्हता,आणि तुझ्याशी मैत्री व्हावी अशी इच्छा देखील नव्हती। म्हणजे ते म्हणतात ना 'love at first side'  तश्यातला काही भाग नाही। तुला माहीत आहे माझे crush स्वप्नील जोशी,अभिनय बेर्डे आहे।पण काही दिवसांपासून दुसऱ्या अभिनेत्याची गाणे मी खूप पाहत आहे ते पण विडिओ कारण त्या अभिनेत्याला पाहता यावे म्हणून या गोष्टीचा संबंध असा की तो अभिनेता तुझ्या सारखा दिसतो। 
काही दिवसांपासून मी असच काहीस विचित्र वागत आहे काय ते मला पण माहिती नाही।माझ्या मनाची समजूत घालण्यासाठी मी सांगितले हे फक्त आकर्षण आहे,पण आकर्षण हे तर चेहरा पाहून होते म्हणजे दिसायला स्मार्ट , हँडसम पण तूच म्हणतो मी यात येत नाही आणि खरचं नाही येत तू यात।मग तरी पण का??? प्रत्येक गाण्यात मला तुझी आठवण येते। एकदा कॉलेज मध्ये आम्ही अंताक्षरी खेळत होतो मी एक छान प्रेमगीत म्हणत होते आणि तू वर्गात आला, काय योगायोग म्हणावा । मग एकदा कॅन्टीन वर असतांना मनात एक गाणे गात असतांना तू समोरून आला।या नंतर तर मी अधिकच गोंधळून गेले। मी उदास असले तर तूच ओळखतो,तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होते पण का माहीत नाही। मी आले की माझी नजर तुलाच शोधत असते। किती विचित्र आहे न सगळ पण ह्या भावना  कितीही केल्या तरी लपवल्या जात नाही। कोणी तरी ओळ्खतेच, ते फक्त घरचे नसावे हेच काय ते सुख। मला ते गाणं फार आवडते "पाहिले जेव्हा तुला मी पाहतांना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला" पण माझ्या माहिती नुसार आपल्यात अस कधी झालंच नाही, तू लेक्चर मध्ये मोबाईल मध्ये नाही तर सर कडे पाहत असायचा। 
एकदा मला कळाले होते तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणे, खरं सांगू खूप दुःख झाले मला, मी त्या दिवशी कधी नाही ते रडले। पण तुला विचारण्याचे धाडस काही झाले नाही।तुला विचारले मी हिची request आली कोण आहे कशी आहे , पण ज्याचे उत्तर हवे होते ते विचारता आलेच नाही शेवटी। एकदा खूप विचार करून विचारले तुला ते पण तुला कळू न देता।आठवतात का ते माझे प्रश्न। त्या नंतर मलाच माझं हसू आलं आणि तुझं उत्तर ऐकून समाधान वाटलं। मला तू आवडतो म्हणजे मला तुझे सगळे गुणच आवडतात असे नाही,मला तुझे सगळे दोष देखील माहीत आहे, तरी तू मला का आवडतो। मी पाहिले तितक्या उदाहरणात मुलींना फक्त गुण हवे असतात त्या दोष कधी डिस्कस करत नाही त्यांना आवडत नाही।पण मला तुझे दोष देखील आवडतात, हे असे का होते । माझी मैत्रीण मला नेहमी सांगायची तो असाच आहे तसाच आहे,पण मी काही तिचे ऐकायचे नाही करण तुझ्या दोषांशी मला काहीच त्रास नाही। हो करतो तू फ्लर्ट करतो,दारू पितो, मांसाहारी खातो,वेळ आली की मारामारी करशील।पण हे सगळे मी तुझ्या सोबत असतांना तू कधीच करणार नाही याची मला खात्री आहे,म्हणून तू मला आवडतो।मी कधी तुझ्या आवडी निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण जर आपल्या आवडी सारख्या असल्या तर संवाद होईल आणि वेगळ्या असल्या तरी वाद पण मला दोन्ही आवडतील।तुझ्याशी संवाद केल्याने मन शांत होते अन ज्ञानात भर पडते ,तर वाद घातल्याने संकल्पना  स्पष्ट होतात। मला तुझ्या सोबत आपल्या कॉलेज च्या स्नेहसंमेलन सहभागी होण्याची फार इच्छा होती,पण आता जाऊ दे। तुझ्या शी बोलून खूप छान वाटलं अगदी मन मोकळं झालं। किती महिन्यापासून सांगायचं होत तुला ते अखेरीस सांगितलं।
फक्त एकच खंत मनात आहे आता।

sandyjournalist7382

sandy

New Creator