तुकाराम महाराज गाथा, अभंग -- कर कटावरी तुळशीच्या माळा । कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ।। १ ।। ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ।। २ ।। कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वाहिली ऐसी मूर्ती ।। ३ ।। गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसी तेंचि रूप ।। ४ ।। झुरोनी पांजरा होऊं पाहे आता । येई पंढरीनाथा भेटावया ।। ५ ।। तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करू नये ।। ६ ।। © balaji boinwad #tukarammgaathaabhang