Nojoto: Largest Storytelling Platform

नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण

 नाण्याच्या दोन बाजू...

कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास्त वागणे, अतिशय प्रक्टिकल थिन्कींग जणू काय तिच्या व्यक्तिमत्वाची शोभाच वाढवत असे. शाळेत कॉलेज मधे नेहमी पहिली येणारी पण त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक कामात निपुण. गरिब परिस्थितीत वाढल्यामुळे कष्टांची आणि पैशांची किंमत जाणणारी.पुढे उच्च शिक्षण घेताना तिची ओळख मीत शी झाली. तिचा त्या व्यक्तिमत्वावर तो पुरताच घायाळ झाला होता. पुढे शिक्षणानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिने तिच्या स्वभावाप्रमाणे सगळ स्पष्ट सांगितले कसे तिच्या आईने वडिल गेल्यानंतर रात्रदिवस कष्ट करुन सगळ्या भावंडांचा सांभाळ केला, सगळ्याना कसे शिक्षण दिले त्यामूळे आता पुढचे काही वर्ष तिला थोडा आधार देण्याची गरज आहे. तिने कुठलीच अपेक्षा न ठेवता हे सगळं केलंय कारण तिची एकच प्रामाणिक इच्छा की जी वेळ माझ्यावर आली जर भविष्यात माझ्या मुलिंवर आली तर शिक्षणाच्या जोरावर त्या परिस्थिती वर मात करु शकतील. लग्नाच्या खर्चाच टेंशन तरी आई ला द्यायची तिची इच्छा नव्हती. तिच्या विचाराने लग्न हे साधेपणाने व्हायला हवे किंवा तिला रजिस्टर पद्धतीने लग्न करायला आवडेल हे तिने बोलून दाखवले. 

मीत च्या घरची परिस्थिती अगदी उलट. त्याच्या घरी लग्न म्हणजे खर्चिक सोहळा, हुंडा देणे घेणे म्हणजे लग्नाचा अविभाज्य भाग.गोतवळ ही खुप मोठं त्यामूळे त्यांचा मानपाण, रुसवे फुगवे हे आपसुकच आले. मीत ला या सगळ्याची जाणीव होती पण तरिही त्याने विचार केला की या गोष्टीवर चर्चेने मार्ग निघेल पण कुंदती सारखी मुलगी त्याला हातातून घालवायची नव्हती. 

त्याने तिला आश्वासन दिले की तो घरी लवकरच या गोष्टीची कल्पना देईन आणि आई शी लग्नाची बोलणी करायला घरच्यांना घेऊन तुझ्या घरी येईन. ठरल्याप्रमाणे आई बाबांशी बोलून तो त्याना कुंदती च्या घरी घेऊन आला. त्यांच्या बोलण्यातून नाराजीचा सुर स्पष्ट उमटत होता. फक्त मुलाच्या हट्टासाठी ते तिथे पर्यंत आले होते. कुंदती च्या आई ला ते जाणवले होते पण तिनेही मुलीच्या आनंदासाठी काही गोष्टीना कानाडोळा केला आणि शेवटी एकदाचे लग्न ठरले. थोड्या कुरबूरी झाल्या लग्नातही पण कुंदती च्या आईने मुलीच्या सुखासाठी सगळे पोटात घातले.

sandyjournalist7382

sandy

New Creator