पहिल्या पावसात भिजून रोम रोम शहारून आले तुझ्या आठवणीत मन माझे भरुन आले विस्मृतीत गेलेला क्षण थेंबा थेंबात बरसुन आला जुन्या त्या बावर्लेल्या काळास तो सोबत घेऊन आला डोळे मिटून झेलता थेंब माथ्यावरी , स्पर्श जाणला तु आहेस समीप सुन्या सुन्या मनी पहिल्या पावसात ,भाव भावना हरीत जागल्या अमिप सरी सरीत कोसळून वाहल्या, पुन्हा भेटीच्या आशा पैजंणाचा झंकार त्या सुरात सूर मिसळून होकारल्या जश्या .. सरी पावसांत इंद्रधनुषी शाल चढूनी ,दमिनीची झालर ओढून घेतली तशी मी या पावसात प्रेमाची शाल चढूनी, तुझ्या आठवणींची झालर घेतली झेलता थेंब हातात क्षणभर जाणले, थेंब हातात हात देऊनी देतो तुझीच साक्ष पाहता या क्षणात नभी उभरून आली नक्षी, ओंजळीत अंबराच्या सांज ही जणु दिव्य ज्योत