प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तुझ्या बसणाऱ्या सरी, आठवणी देऊन जातात माझ्या लहानपणीच्या, खोडकरपणाच्या, एकांतात गाळणाऱ्या अश्रुंच्या । आज पर्यंतचा आपला प्रवास, मैत्रीच्या नात्यापलीकडचा राहीलाय, माझ्या प्रत्येक सुखा दुःखात, तू माझा साथीदार बनून आलास । मी ही कंटाळलो नाही तुझ्या ह्या बरसण्याला, मैत्रीचा खरा अर्थच तू समजावलास, निष्ठा आणि प्रयत्न तू देखील पाहिलेस, परंतु तुला आणि मला समाजाने गरजे पुरतं मर्यादित ठेवलंय । #आठवणीतला पाऊस ©-स्वप्निल ©Swapniel Gaekwad #bestfrnds