बालपण बालपणाचे ते दिवस दिवसांतील ते क्षण हरवून जातो विचारांत कुठे गेले हे सर्वजण! पावसाळा,हिवाळा,उन्हाळा ऋतू तीन हे वर्षांतले सवंगड्यांची साथ लाभली होते ते क्षण हर्षांतले आजही आठवतात गोष्टी कविता शिक्षकांच्या तासाला खाल्लेला मार त्यांनाही आठवतो का मी? मनात संभ्रम उठतात फार! भूतकाळासारखे घडावे वर्तमानातही पुन्हा भरावी आमची शाळा रम्य पावसात आजही जावे भिजत पुन्हा विचारावे शिक्षकांनी काल का नाही आलास बाळा?