जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories