मला मिळवण्यासाठी तू काय काय करशील? की सहज नशिबावर सोडून मोकळी होणार की,मला सोडण्याचे हजार कारणे सांगून माझ्यापासून कायमची सहज दूर होणार? मनात काय असते तूझ्या हेच ना की,देव देईल ते काही न बोलता ओंजळीत घेणार की, मंदिरातील त्या प्रत्येक देवासमोर नवस करून रिकाम्या ओंजळीत फक्त मला मागणार? प्रत्येक जण काही मिळवण्यासाठी उपवास,नवस करून साकडं घालतो तू माझ्यासाठी यातून काय काय करणार? की स्वतःच्या वेगळ्या भविष्याचा विचार करून मला विसरून, माझं हात सोडून पुढे पुढे चालणार? महत्वाचं काय तुला मी, पैसा, इतर नाती, समाज की आपलं प्रेम इतर गोष्टींसाठी मला की माझ्यासाठी इतर गोष्टींचा त्याग करणार? की, मन भरलं म्हणून इतर मुलींसारखी वाद करून, बहाना करून स्वतःपासून कायमचं वेगळं करणार? 80% तर वाटतं मनाला तू नाहीच इतरांसारखी परंतु आजचं जग बघता 20% तरी मनात शंका असणार माझ्यापासून दूर जाण्यासाठी हजार कारणे असतील जरी परंतु सोबत राहण्यासाठी तुला एक कारण पुरेसा असणार... एक च जीवन मिळालं हे आपल्याला आनंदी जगायला आता तूच ठरव कोणासाठी आणि कोणासोबत जगणार? जपशील आपली प्रेमाप्रती असलेली प्रामाणिकता की,तुझं ही मन नेहमी दुसरा कुणी शोधणार? हल्ली सगळेच स्वतःचं स्वार्थ बघतात ना नुसतं आणि म्हणून मी तरी काय करू माझं मन जर असं विचार करणार? फरक पडेल की नाही तुला ह्याचं विचार तर येतं हात सोडशील तू जेव्हा आणि मी तुझ्यासाठी मरणार... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Ratan_Tata love story loves quotes one sided love quotes sad for him quote on love