मी आणि श्रावण....! श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक्त मी आणि मीच उरतो...! माझ्या अंतरीचा श्रावण जेव्हां जेव्हां मनमुराद बरसतो... तेव्हा तेव्हा सोबत माझ्या माझा एकटेपणाच असतो...! जेव्हां जेव्हां आठवणींच्या धारा घेऊन तो बेभान होऊन कोसळतो.. तेव्हा तेव्हा प्रत्येक आठवणींत मला माझा एकटेपणाच दिसतो..! श्रावणधारांच्या त्या प्रत्येक थेंबाथेंबांत जरी ती अन् मी दिसतो... तरीही सोबत माझ्या तेव्हा फक्त माझा एकटेपणा असतो...! श्रावणाचं सौंदर्य पाहून क्षणक्षण अन् कणकण हर्षाने हसतो.. मलाही आठवतात ते सुखावणारे क्षण अन् मग मी ही बरसतो..! जेव्हां सृष्टीला श्रावण हिरवाकंच जरीकाठीचा शालू नेसवतो.. मी मात्र तेव्हा आम्ही दोघांनी विणलेल्या स्वप्नांचा एक एक धागा उसवतो..! व्हावीत पाहीलेली सारी स्वप्नं पूर्ण असा ही काही नियम नसतो.. मग मात्र माझा एकटेपणाही माझ्यासोबत मनमोकळे हसतो...! मनमोकळे हसतो...मनमोकळे हसतो 😊 -संतोष लक्ष्मण जाधव. 06/08/2020. #मी आणि श्रावण...! मी आणि श्रावण....! श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक्त मी आणि मीच उरतो...! माझ्या अंतरीचा श्रावण जेव्हां जेव्हां मनमुराद बरसतो... तेव्हा तेव्हा सोबत माझ्या माझा एकटेपणाच असतो...!