आपलं नेहमी हे असंच असतं, कितीही चांगले वागलो एकमेकांशी, तरीही कुठल्या न कुठल्या कारणांवरून फिस्कटत राहते. भांडणे तर नाही पण राग रुसवे चालू राहते, आखडून बसल्यावर मात्र पहिले कोण बोलेल ह्याची जणू आपल्यात स्पर्धाच असते. स्पर्धेत ह्या नेहमी तूच बाजी मारते, चूक जरी तुझी असली तरी मलाच नमते घ्यावे लागते. तू ही मग उगाच फुशारकी मारत म्हणते, खरं तर मीच पहिले आवाज द्यायला पाहिजे,माझेच चुकते. विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन बसते, मी ही म्हणतो मग,जाऊ दे,आपलं हे नेहमीचंच झालंय, तुझं माझं जमेना,तुझ्यावाचून करमेना. लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझंमाझं #yqtaai #३२/३६५