बलात्कार
रोज किमान एक बातमी असते बलात्काराची वर्तमान पत्रात...
रोज एक बातमी असते लचके तोडणार्या श्वापदांची...
पण या पेक्षा अधिक बलात्कार होतात दररोज जे प्रकाशात येतच नाहीत...
तो बलात्कार असतो एका भ्रष्ट अधिकार्याने सामान्यांच्या हक्कांवर केलेला...
तो बलात्कार असतो एका राजकीय नेत्याने मतदाराच्या अपेक्षांवर केलेला...
तो बलात्कार असतो समाज व्यवस्थेने स्त्री स्वातंत्रते वर केलेला...
तो बलात्कार असतो बोथट शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थी मनावर केलेला...