सर्वांना असे आवड भारी पुरस्कारांची हारतुरे ,गुच्छ ,शिल्ड व शालेची।।धृ।। ज्याच्या हातून घ्यायचा पुरस्कार नाकर्त्यालाच करावा लागतो नमस्कार पैश्याचा व सत्तेचा असतो चमत्कार नाइलाजाने करावा लागतो स्वीकार खैरात करत निवडतात लाळघोट्याची।।१।। स्वाभिमान्याला नसते आशा पुरस्काराची नच अभिलाषा सज्जनास असे उर्मट भाषा प्रामानिकाच्या नावावर रेषा बेबंदशाही भासे पुरस्कार निवडीची।।२।। ओंगळवाणे पुरस्कार