माणसाचीच भीती येथे आज माणसाला.. जवळीक साधण्या उभा जन्म गेला निसर्गाने असा काय खेळ केला? आज दुरावा ठेवण्या प्रत्येक सरसावला माणसाचीच भीती येथे आज माणसाला... सतत पायाला लावून भिंगरी गतीलाही मागे सोडणारी माणसांची गर्दी मिरवणारी शांत कशी ही मुंबई नगरी.. आता कुठेतरी हे थांबले पाहिजे गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही घरातच सुरक्षित राहिले पाहिजे. #माणसाचीच भीती येथे माणसाला