Nojoto: Largest Storytelling Platform

तुला भेटायला येताना मुद्दाम काही वेगळं नटत बीटत न

तुला भेटायला येताना 
मुद्दाम काही वेगळं नटत बीटत नाही 
तू भेटल्यावर खरं तर इतकी 
सुंदर दिसते मी 
की कसल्याही मेकअप 
किंवा दागिन्यांची गरज नसते
मी सुंदर दिसण्यासाठी 

पण त्या दिवशी तू म्हणालास 
"सुंदर दिसते आहेस खूप 
फ़क्त कपाळावर एक जरा 
मोठी टिकली हवी होती"
बस्स ...तेव्हापासून 
कपाळावर मोठी टिकली लावते 
आणि तू दिसतोस ठसठशीत 
छे कपाळावर नाही चेहऱ्यावर .....
तुला भेटायला येताना 
मुद्दाम काही वेगळं नटत बीटत नाही 
तू भेटल्यावर खरं तर इतकी 
सुंदर दिसते मी 
की कसल्याही मेकअप 
किंवा दागिन्यांची गरज नसते
मी सुंदर दिसण्यासाठी 

पण त्या दिवशी तू म्हणालास 
"सुंदर दिसते आहेस खूप 
फ़क्त कपाळावर एक जरा 
मोठी टिकली हवी होती"
बस्स ...तेव्हापासून 
कपाळावर मोठी टिकली लावते 
आणि तू दिसतोस ठसठशीत 
छे कपाळावर नाही चेहऱ्यावर .....