Nojoto: Largest Storytelling Platform

ह्या 21 व्या शतकात मला गरज आहे पोटाच्या भूकेपेक्ष

ह्या 21 व्या शतकात 
मला गरज आहे पोटाच्या भूकेपेक्षा
पुस्तकाची, वाचनाची, ज्ञानाची
परीस्थितीचा अवलोकन करून
अनुभव संपन्नता वाढवण्याची
कोणत्याही संवेदनशील कुबड्यांपेक्षा
स्वतःचा आधार घेऊन पुढे पुढे जाण्याची
प्रबळ आत्मविश्वास जागृत करण्याची
सामाजिक अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची
या बेगडी जगाला लाथाडून 
नव्या जगाचा शोध घेण्याची
ते नवे जग जेथे प्रत्येक माणूस
फक्त माणूसकीचीच जात जगेल
तेथे तो फक्त माणूसच बनून राहील
तेथे मी आणि तूपणा असणार नाही
असेल फक्त माणूस 
माणूसकीच्या अनुभूतीतून स्पर्शणारा
तेथे झोंबतील वारे एकतेचे
महालमाड्यांना आणि खोपटांना नमवून आलेले
मातीच्या गर्भातून उगवलेले
लता, कुंज, वृक्ष, झुडूपे, पाणी इत्यादीचे
सगळ्यांनाच मालकत्व असलेले 
भेदविरहीत, निरपेक्ष, स्वच्छ, सुंदर 
निर्भेळ सत्याने गजबजलेले जग
गलीच्छ राजकारणाला मूठमाती देऊन
समाजवादाने अंकुरलेले जग
होय, तेच ते
मला गरज आहे त्या जगाची
मला गरज आहे त्याच जगाची मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
#गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
ह्या 21 व्या शतकात 
मला गरज आहे पोटाच्या भूकेपेक्षा
पुस्तकाची, वाचनाची, ज्ञानाची
परीस्थितीचा अवलोकन करून
अनुभव संपन्नता वाढवण्याची
कोणत्याही संवेदनशील कुबड्यांपेक्षा
स्वतःचा आधार घेऊन पुढे पुढे जाण्याची
प्रबळ आत्मविश्वास जागृत करण्याची
सामाजिक अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची
या बेगडी जगाला लाथाडून 
नव्या जगाचा शोध घेण्याची
ते नवे जग जेथे प्रत्येक माणूस
फक्त माणूसकीचीच जात जगेल
तेथे तो फक्त माणूसच बनून राहील
तेथे मी आणि तूपणा असणार नाही
असेल फक्त माणूस 
माणूसकीच्या अनुभूतीतून स्पर्शणारा
तेथे झोंबतील वारे एकतेचे
महालमाड्यांना आणि खोपटांना नमवून आलेले
मातीच्या गर्भातून उगवलेले
लता, कुंज, वृक्ष, झुडूपे, पाणी इत्यादीचे
सगळ्यांनाच मालकत्व असलेले 
भेदविरहीत, निरपेक्ष, स्वच्छ, सुंदर 
निर्भेळ सत्याने गजबजलेले जग
गलीच्छ राजकारणाला मूठमाती देऊन
समाजवादाने अंकुरलेले जग
होय, तेच ते
मला गरज आहे त्या जगाची
मला गरज आहे त्याच जगाची मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
#गरजआहे हे टँग करायला विसरु नका.