Nojoto: Largest Storytelling Platform

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तु

श्वासांचा श्वासांना पडता विळखा..

कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही
मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही

हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा
 थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा

लपेटून घ्यायचे असते तुला उबदार श्वासात
नको असतो थोडाही दुरावा प्रणयी सुवासात

विळख्यात तुझ्या अखंड डुंबून माळावा सुगंध
भिडता नजरेला नजर यौवनाचा भलताच गंध

कडाडावी शलाका रे तुझ्या हळुवार स्पर्शाने
मी माळावा अवघा वसंत किती किती हर्षाने

श्वासांचा श्वासांना पडता विळखा मंत्रमुग्ध व्हावे
मला जे जे सांगायचेय ते न सांगता तुला कळावे

सरसावून यावास तू मला घेण्या मिठीत सखया
सामावता तुझ्या बाहूत क्षणही नको जावा वाया......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  श्वासांचा श्वासांना पडता विळखा..

कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही
मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही

हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा
 थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा #शायरी

243 Views