Nojoto: Largest Storytelling Platform

राधा प्रत्येकाला व्हायचंय इथे पण रुक्मिणी होणं प्

राधा प्रत्येकाला व्हायचंय इथे 
पण रुक्मिणी होणं प्रत्येकाला जमलंच नाही 
राधेला रुक्मिणी ची जागा द्यायला जरी तयार इथे कृष्ण
तरी रुक्मिणी होऊन कृष्णा ला कायमचं आपलं करणं जमलंच नाही...
देवांच्या काळात ही झालेत प्रेम विवाह 
पण इथे माणूस होणं कोणाला जमलं नाही 
जो तो उपभोग घेऊन निघून जातो कायमचा 
खरं तर इथे प्रेम करणं कोणाला जमलंच नाही...
इथे जात पात संपत्ती नोकरी बघून लग्न होतात 
हे न बघता स्वतःच्या प्रेमासाठी समर्पित होऊन जगणं कोणाला जमलं नाही 
कारणांचा भंडार तयार करून ठेवलाय प्रत्येकानी 
खरं तर शेवटपर्यंत प्रेम निभावणं कोणाला जमलं नाही....
राज्याची राणी व्हायचं प्रत्येक मुलगी स्वप्न बघतेय 
पण रामाची सीता होणं कोणाला जमलं नाही 
त्याग करतील इथे कृष्ण,राम आणि प्रत्येकाचा 
पण स्वतःच्या प्रेमासाठी परीक्षा देणं कोणाला जमलं नाही....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  sad status sad status sad song sad status in hindi sad quotes about life and pain