Nojoto: Largest Storytelling Platform

*जडत्व* एखाद्या दगडाला मूर्तीचे स्वरूप दिले

*जडत्व* 
     एखाद्या दगडाला मूर्तीचे स्वरूप दिले जाते. त्यावर वस्त्र, आभूषण ,अलंकार, लेप फार अशा वस्तूंनी सजवले जाते त्या मूर्तीचे वजन या गोष्टींनी आणखी वाढत. याला जपण्यासाठी नाजूकसा धक्काहि टाळला जातो.या मूर्ती रुपी उदाहरणात मानवाला ठेवलं तर!
     मनुष्य स्वतःला उच्च पदावर नेण्यासाठी कित्येक आकार देऊ पाहतो, त्यावर कित्येक आवरण चढवतो, त्याला नाव अनेक आहेत. त्यात शब्द न लादलेलेच बरे हे ज्याचे त्याने ओळखून जाव. हे वाचताना मनात आलेले शब्द लिहिणाऱ्याला हे म्हणायचं होतं का ? असं विचारण्यापेक्षा मला त्या आवरणामध्ये हेच शब्द का दिसले? माहित आहे म्हणून का आवडलं म्हणून? ती आवरण मी चढवलीत म्हणून ?अस स्वतःलाच विचारलं तर बर होईल.         
     या मूर्ती भंगल्यानंतरच त्याची किंमत कमी होते ; तसं माणसाला ठेच लागल्यानंतर स्वतःची खरी किंमत कळते आणि समोरच्याच्या मनात मात्र किंमत कमी होते.    
      जास्त जड झालं की उंचावर जाऊ शकत नाही. तसेच माणसाचं मन भावनेने , दुखाने प्रतिष्ठेच्या वलयाने इतकंच काय पण पराकोटीच्या समाधानाने जरी व्यापल तरी तो जड होऊन जागीच थांबतो .
      मूर्तीत आणि मानवात एक अंतर आणि एक साम्य आहे. मूर्तीला आकार देणारा ,मागणी करणारा ,विकणारा ,विकत घेणारा वेगळा असतो. तसेच मानवालाही आकार देणारा खूप गोष्टी असतात हे झाले साम्य; आणि अंतर विचाराल तर मुर्ती बदलू शकत नाही मानवाला तसा शाप किंवा वरदान आहे.
                                    ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने.
                                    सोलापूर. #inertia #जडत्व