*यंदा तरी जिकू दे* (आगरी - हास्य कविता) दहा दिवस माझे खिशान दोन-चार पैसे तरी टिकू दे ! *दर वर्षी मीच कसे हारताव* *देवा यंदा तरी मला जिकू दे !* ( तरुण - पोरगा )... शेल यो पत्त्यांचा आमी रोजच नाय शेलत ! जुगारी असल्याचं टोमनं असं नेहमीच नाय झेलत ! मला लागलेली हाराची आदत तिला कायमची बाहेर फेकू दे *दर वर्षी मीच कसे हारताव* *देवा यंदा तरी मला जिकू दे !* ( गृहिणी )... घरान पावण्यांची रेलचेल आख्खा दिवस व्हते माझी दमाई ! करमणूक म्हणून बसताव रातचे तया पण रोज गमाईच गमाई ! यांचे खिशावं कवरा मारू डल्ला एक दिवस तरी माझं हात रोखू दे! *दर वर्षी मीच कसे हारताव* *देवा यंदा तरी मला जिकू दे !* ( बारका पोऱ्या ).... चिल्लर झेवून बसताव रोज सकाल पर्यंत एक पैसा नाय टिकत ! माझे बाजूची सगळी जिकतान ना मीच कला नाय जिकत ! माझे जवल साचलेले पैसे कवा तरी मला गल्ल्यान टाकू दे ! *दर वर्षी मीच कसे हारताव* *देवा यंदा तरी मला जिकू दे !* ( डोकरा आजू ).... उमर जेली माझी शेलून शेलून अजून तो दिवस नी अला ! थोरंसं जिकलेलं पैसे मीनी बायको जवल केलंव गोला ! या उतार वयान तरी जिंकलेलं पैसे माझे म्हातारी जवल गर्वाने फेकु दे ! *दर वर्षी मीच कसे हारताव* *देवा यंदा तरी मला जिकू दे !* ( सगळ्यांसाठी ).... तीन पत्ती,रमी,मेंढी कोट जुगाजुगी,फुगाफुगी सगळा शेलून बगला! कनानच या कमनशिबीचा कवा निभाव नी लागला ! माझ्याव लागलेला पणवतीचा शिक्का ! एकदा तरी झाकू दे ! *दर वर्षी मीच कसे हारताव* *देवा यंदा तरी मला जिकू दे !*