येरे पावसा घेऊनि आनंद शहारा, थेंबातुनी दाखव अद्भुत कांचन नजारा... आगमनवेळी हवेतल्या गंधात सर्व दंग छटा आकाशी काळी पण मनात सप्तरंग निसर्ग जणू देतो समृद्धीचा जलइशारा येरे पावसा घेऊनि आनंद शहारा... खिडकीत वाट पाहते प्रेयसी गारव्याची नृत्य मयूरावस्था होते मग्न प्रेमपारव्याची वाढव प्रेमसागर मिलनास आतुरलाय किनारा येरे पावसा घेऊनि आनंद शहारा... वाहू दे कोरडपथावर खळखळून संगीतपाट फुटू दे सर्वत्र हिरवळीचे पाझरमाठ दे समद्यांना मनसमाधान अन डोईवर सुखभारा येरे पावसा घेऊनि आनंद शहारा... येरे पावसा... #marathi #selfwritten #PoemIsLove