Nojoto: Largest Storytelling Platform

#स्त्री... सारी बंधने तुलाच का ? तु म्हणजे सतत सं

#स्त्री...

सारी बंधने तुलाच का ?
तु म्हणजे सतत संस्काराच्या ओझ्याखाली दबलेली अत्तराची जात
तु म्हणजे नेहमी असावे सातच्या आत घरात 
आमची माञ राञी-अपराञी येते वरात....
सारी कामं तुलाच का ?
ऑफिसमधून थकून आल्यावर गॅसपुढे तुच स्वतःला पोळवुन घ्यावं
आम्ही माञ टि.व्ही पाहत अंथरूणात लोळावं
साऱ्या जबाबदाऱ्या तुलाच का ?
तुलाच भरण्यासाठी जावं लागतं अन् करावी लागते सतत वणवण
लाईट बील,पोरांच्या शाळेची फी,रेशन बील
अन् हॉस्पिटल तसेच बरेचदा हॉटेल बील
आमची माञ या कामात कमी होते पोझीशन
हे असं कुठपर्यंत चालणार ? कधी ही परिस्थिती कधी बदलणार ?
की वर्षानुवर्ष तुझं आयुष्य असंच सरणार ?
अनेक प्रश्न आहेत मनी
काळजाचा ठाव घेतात
ते क्षणोक्षणी
तुलाच करावं लागतं
सतत सारं सहन
कधी सुटणार हे सर्व प्रश्न गहन ?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्रीजन्म
#स्त्री...

सारी बंधने तुलाच का ?
तु म्हणजे सतत संस्काराच्या ओझ्याखाली दबलेली अत्तराची जात
तु म्हणजे नेहमी असावे सातच्या आत घरात 
आमची माञ राञी-अपराञी येते वरात....
सारी कामं तुलाच का ?
ऑफिसमधून थकून आल्यावर गॅसपुढे तुच स्वतःला पोळवुन घ्यावं
आम्ही माञ टि.व्ही पाहत अंथरूणात लोळावं
साऱ्या जबाबदाऱ्या तुलाच का ?
तुलाच भरण्यासाठी जावं लागतं अन् करावी लागते सतत वणवण
लाईट बील,पोरांच्या शाळेची फी,रेशन बील
अन् हॉस्पिटल तसेच बरेचदा हॉटेल बील
आमची माञ या कामात कमी होते पोझीशन
हे असं कुठपर्यंत चालणार ? कधी ही परिस्थिती कधी बदलणार ?
की वर्षानुवर्ष तुझं आयुष्य असंच सरणार ?
अनेक प्रश्न आहेत मनी
काळजाचा ठाव घेतात
ते क्षणोक्षणी
तुलाच करावं लागतं
सतत सारं सहन
कधी सुटणार हे सर्व प्रश्न गहन ?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्रीजन्म