बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा ©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम