मी मराठी माय मराठी बसते आमच्या ठायी ठायी मराठी ।। कुळ मराठी धर्म मराठी जात मराठी पंथ मराठी ।। मी मराठी ।। श्वास मराठी ध्यास मराठी विचार मराठी बोल मराठी ।। मी मराठी ।। अमृताहूनी गोड माझी बोली मराठी, समुद्रापार ही तिची ख्याती, माझी माय मराठी मी मराठी ।। लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.