रंग केशरी सांज ल्यायली कातरवेळी तुझी आठवण येते मजला संध्याकाळी दिली घेतली कितीक वचने दोघांनीही कसे संपले सारे काही असे अवेळी तुटले नाते कसे अचानक कळले नाही जाता जाता निघून कोणी वळले नाही कसला रुसवा राग कोणता होता तेव्हा परंतु ओठी शब्द आपल्या आले नाही असे जरी हा करार झाला न लिहीलेला ऐक सांगते प्रसंग मजला आठवलेला निरोप घेता डोळा पाणी दोघांच्याही रुतून बसला मनात तो क्षण अवघडलेला काय असे हे झाले आहे मला कळेना अडकुन राही मनी हुंदका प्रश्न सुटेना हाक दे मला सख्या कधीही मनापासुनी तुझ्याविना रे माझा सखया जीव रमेना ©उमा जोशी १७/०३/२०२१ ©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #तुझ्याविना