Nojoto: Largest Storytelling Platform

हाताचे बळ जवळ असताना निराश कधी व्हायचे नसतं नेहमी

हाताचे बळ जवळ असताना
निराश कधी व्हायचे नसतं
नेहमी दु:खाची उजळणी करत
हताश कधी रहायचं नसतं..

यश पदरात पडत नाही
म्हणुन कधी रडत बसायच नसतं
नव्या जोशाने सुरुवात करत
जीवनाची दिशा बदलायची असते..

हाताची ओंजळ दुस-यासमोर धरुन
लाचारी कधी स्विकारायची नसते
संकटांची भिती न बाळगता
कष्टाने त्यावर मात करायची असते..

लोक काय बोलतील
याचा विचार कधी करायचा नसतो
आपल्या उज्वल भविष्यासाठी 
वर्तमानकाळ आनंदी जगायचा असतो..

दिवसभर नुसते कुडत बसुन
आपली रडवी कथा कधी गायची नसते
आत्मविश्वासाने काम करुन
नव्या दिवसाची वाटचाल चालायची असते..

उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी
आजच आघात सोसायचे असतात
अनुभवातुन आलेल्या शहाणपणातुनच
जीवनाचे रंग फुलवायचे असतात..

                                                       SK Live Happy Life
हाताचे बळ जवळ असताना
निराश कधी व्हायचे नसतं
नेहमी दु:खाची उजळणी करत
हताश कधी रहायचं नसतं..

यश पदरात पडत नाही
म्हणुन कधी रडत बसायच नसतं
नव्या जोशाने सुरुवात करत
जीवनाची दिशा बदलायची असते..

हाताची ओंजळ दुस-यासमोर धरुन
लाचारी कधी स्विकारायची नसते
संकटांची भिती न बाळगता
कष्टाने त्यावर मात करायची असते..

लोक काय बोलतील
याचा विचार कधी करायचा नसतो
आपल्या उज्वल भविष्यासाठी 
वर्तमानकाळ आनंदी जगायचा असतो..

दिवसभर नुसते कुडत बसुन
आपली रडवी कथा कधी गायची नसते
आत्मविश्वासाने काम करुन
नव्या दिवसाची वाटचाल चालायची असते..

उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी
आजच आघात सोसायचे असतात
अनुभवातुन आलेल्या शहाणपणातुनच
जीवनाचे रंग फुलवायचे असतात..

                                                       SK Live Happy Life
sk4214752866764

SK

New Creator