आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती कडक चहाला कांदाभजीची सोबत होती उनाड वारा नुसताच वाहत होता आभाळ आपल्या जमिनीकडे ओल्या डोळ्यांनी पाहत होता त्या दोघांची प्रेमकहाणी थोडी आगळी होती आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती समोरच एखादी वीज कडकडत होती ढगांसोबत जणू ती बडबडत होती उन्हाळ्याची उष्णता आता संपणार सगळी होती आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती आजचा पाऊस नुसताच बरसत होता जमिनीला भेटणयासाठी खुप तरसत होता मातीचा सुगंध चोहीकडे पसरत होता मातीच्या त्या सुगंधाची चवच वेगळी होती आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती ✍🏻राहुल साहेबराव मोहिते prince🤴🏻 At. वडनेर तालुका मालेगाव जिल्हा नासिक