Nojoto: Largest Storytelling Platform

गझल (नावात काय आहे !) व्रूत्त : आनंदकंद लगावली :

गझल (नावात काय आहे !)

व्रूत्त : आनंदकंद
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा

कोणी जरी म्हणाले नावात काय आहे?
नाही कसे म्हणावे गावात काय आहे !
**
कष्टाविना न लागे भाग्यास भाग मोठा
काही कसे म्हणावे दैवात काय आहे !
**
ज्याचासखा मुरारी त्याने कशास भ्यावे
आहे धनी यशाचा कौरवात काय आहे !
**
झाली जरी पुराणे वाचून सातवेळा
अंतीम काय झाले? ओव्यात काय आहे !
**
झोकात राहतो तू आहेस काय मोठा
साधेपणात जे जे गर्वात काय आहे !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 एक गझल ( नावात काय आहे !)
गझल (नावात काय आहे !)

व्रूत्त : आनंदकंद
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा

कोणी जरी म्हणाले नावात काय आहे?
नाही कसे म्हणावे गावात काय आहे !
**
कष्टाविना न लागे भाग्यास भाग मोठा
काही कसे म्हणावे दैवात काय आहे !
**
ज्याचासखा मुरारी त्याने कशास भ्यावे
आहे धनी यशाचा कौरवात काय आहे !
**
झाली जरी पुराणे वाचून सातवेळा
अंतीम काय झाले? ओव्यात काय आहे !
**
झोकात राहतो तू आहेस काय मोठा
साधेपणात जे जे गर्वात काय आहे !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 एक गझल ( नावात काय आहे !)