Nojoto: Largest Storytelling Platform

मध्यरात्र(लेख👇) बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यर

मध्यरात्र(लेख👇) बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मध्यरात्री जाग आली.नंतर बराच वेळ डोळा लागत नव्हता.खिडकीबाहेर पाहिलं तर भयाण शांतता पसरली होती.उंच उंच इमारतींचे काही दिवे मंद प्रकाश देत होते,काही दिवे ताऱ्यांसारखे लुकलुकत होते.लुकलूकणारे दिवे मानवी पाखरासाठी म्हणे सिग्नल असतो तो.शांत रस्ते काळेकुट्ट दिसत होते.
मध्येच एक एक्स्प्रेस ट्रेनचा आर्त भोंगा वाजत होता.सगळं शांत शांत होतं असं मला वाटत होतं.

माहित नाही पण ही रात्र मी माझ्यामध्ये कुठंतरी आत जगते असं मला वाटतं. माझ्या मनात मी असेच स्वप्नांचे उंच उंच मनोरे रचलेले आहेत.त्यातली साकार झालेली स्वप्न मला मंद प्रकाशाचा आनंद देत असतात. सत्यात न उतरलेली स्वप्न लुकलुकत असतात.मला जाणीव करून देतात ,"हो प्रेरणा तू एकटीनं हे सहज करू शकतेस." 
ते काळेकुट्ट रस्ते म्हणजेच चुकनमाकुन आलेलं नैराश्य जे मी सहज पायदळी तुडवून मी माझी स्वप्नं पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असते.

ती जाणारी एक्स्प्रेस ट्रेन म्हणजे अर्ध्यावर मला सोडून गेलेली माणसं जी माझ्या मध्ये आजही सजीव आहेत, त्यांना घेऊन मी आयुष्य प्रवास करत असते.कुठल्या पायरीवर येऊन नेमकं गणित चुकलं याचा सतत मी हिशोब लावण्याचा प्रयत्न करत असते.हा हिशोब काही केल्या लागत नाही.
त्या लोकांना एक आर्त हाक मी मारत असते, जी कोणालाही ऐकू जात नाही.जास्त जोराचा आवाज झाला की लोक कान बंद करून घेतात तसंच बहुधा झालं असावं...असो...!