वैर ना त्याचे कुणाशी,नाते फक्त मातीशी. कायदे निघतात अशी,काहीच नाही राहत हाताशी, खेळी होते राजकारण्यांची,हाल मात्र शेतकऱ्यांची. निसर्ग ही मारतो कधी,कधी मारतो अंगावरील कर्ज, स्वतःच्या मेहनतीचे चीज व्हावे इतकीच त्याची विनवणी वजा अर्ज. हक्कासाठी दिल्लीच्या वेशीवर माझा शेतकरी बसलाय उपाशी, पूर्ण व्हाव्या त्यांच्या मागण्या प्रार्थना हीच माझी देवाशी. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी..... #माझाशेतकरी हा विषय Snehal Rupnawar Patil यांचा आहे.