Nojoto: Largest Storytelling Platform

चहाचे डाग (लेख) "व्वा...! नेहा सुंदर दिसत आहेस, या

चहाचे डाग (लेख) "व्वा...! नेहा सुंदर दिसत आहेस, या पांढरा शुभ्र ड्रेसमध्ये खरंच तू एखाद्या लुकलूकणार्या चांदणी सारखी दिसत आहेस" असं मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले. यावर दुसरी मैत्रिण म्हणाली ,"नेहाने आपल्याला ताटकळत ठेवलं, तू हिला ओरडायचं सोडून हिचं कौतुक काय करत बसलीस." असं म्हणून घाईघाईने आम्ही सगळ्या हॉटेलमध्ये गेलो. गप्पांच्या नादात कौतुकाने भारावून गेलेल्या नेहाने बसताना पाहिलं नाही , त्या बसण्याच्या जागेवर चहा सांडला होता, ती तशीच बसली.माझं नेमकं तिथे लक्ष गेलं. नेहा पार हिरमुसली जेव्हा या पांढऱ्याशुभ्र ड्रेसवर डाग पडलेलं तिनं पाहिलं. आमच्यातली एक मैत्रिण म्हणाली, "आता तू घरी कशी जाणार, लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहणार, चहाचा हा डाग एखाद्या विटाळाच्या डागासारखा दिसत आहे, तुला माहिती आहे की हा चहाचा डाग आहे, पण तू इतरांना कसं समजावशील ? लोक तुझ्यावर विश्वास कसा ठेवतील ?" हे ऐकून तर नेहाचे डोळे पाणावले.
मला वाटतं एखाद्या घटस्फोटीत स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोन हा चहाच्या डागाकडे विटाळ म्हणून पाहतो तसाच असतो.समाजाने आखून दिलेल्या चौकटीत अडकून न पडता घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी त्या स्त्रीने स्वतःसाठी घेतलेला 
निर्णय असतो.कारण एकतर्फी नातं टिकवणं निरर्थक असतं.आपल्या समाजात घटस्फोट झालेल्या स्त्री कडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं , जसं की, विश्वासास पात्र नसलेली किंवा मग नवऱ्यानं टाकून दिलेली , असं आणि बरंच काही..
मोकळा श्वास घेण्यासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयासाठी दुर्दैवाने एक डाग कायम घेऊन शांत राहून जगावं लागतं...
--प्रेरणा