Nojoto: Largest Storytelling Platform

चिऊताई कित्येक वर्ष गायब होतीस गं चिऊताई तू गावात

चिऊताई

कित्येक वर्ष गायब होतीस गं
चिऊताई तू गावातूनी,
माणसांनीच केली होती घोडचूक
शिवारांवर औषधे फवारुनी.

इकडून-तिकडून फिरायचीस तू
उपाशीपोटी अन्नाविना,
ओसाड होती रानोमाळं
तुझ्या त्या घरट्याविना.

गेली होतीस तू गाव सोडूनी
प्रदूषणाच्या त्या शहराला,
हाल-अपेष्टा सोसल्यास गं तू
पण गाव मात्र पोरका झाला.

खुप दिवसांनी पहायला मिळालं
तुझं हे गोजिरवाणं रुप
तुझं हे सुंदर रुप पाहण्यासाठी
मनाला ओढ लागली होती खुप.

सकाळच्या त्या सुंदर प्रहरी
तुझा तो किलबिलाट ऐकायला येतो,
चिवचिव करणारा तुझा तो मंजूळ आवाज 
सर्वांनाच आता हवाहवासा वाटतो.

नको जाऊस गं पुन्हा अशी कधी
गाव-रानोमाळ  सोडूनी,
गजबजलेलं राहूदे हे परिसर 
तुझ्या त्या सहवासानी.

-(शुभम महादेव काप) कविता :- चिऊताई
कवी :- शुभम म. काप
चिऊताई

कित्येक वर्ष गायब होतीस गं
चिऊताई तू गावातूनी,
माणसांनीच केली होती घोडचूक
शिवारांवर औषधे फवारुनी.

इकडून-तिकडून फिरायचीस तू
उपाशीपोटी अन्नाविना,
ओसाड होती रानोमाळं
तुझ्या त्या घरट्याविना.

गेली होतीस तू गाव सोडूनी
प्रदूषणाच्या त्या शहराला,
हाल-अपेष्टा सोसल्यास गं तू
पण गाव मात्र पोरका झाला.

खुप दिवसांनी पहायला मिळालं
तुझं हे गोजिरवाणं रुप
तुझं हे सुंदर रुप पाहण्यासाठी
मनाला ओढ लागली होती खुप.

सकाळच्या त्या सुंदर प्रहरी
तुझा तो किलबिलाट ऐकायला येतो,
चिवचिव करणारा तुझा तो मंजूळ आवाज 
सर्वांनाच आता हवाहवासा वाटतो.

नको जाऊस गं पुन्हा अशी कधी
गाव-रानोमाळ  सोडूनी,
गजबजलेलं राहूदे हे परिसर 
तुझ्या त्या सहवासानी.

-(शुभम महादेव काप) कविता :- चिऊताई
कवी :- शुभम म. काप