Nojoto: Largest Storytelling Platform

काळीज तुटता तुटता.. काळीज तुटता तुटता तुटून जातो

काळीज तुटता तुटता..

काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस
का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस

वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत
अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत

नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो
कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो

प्रेम करुनिया वैकुंठी रिक्त ज्याची ओंजळ
भाव तयाचे असतात किती किती प्रांजळ

हे राम तुम्ही म्हणता मर्यादाचे कर पालन
अपनत्व इच्छा मनी अवगुणांचे व्हावे क्षालन

कसे आणि कोठून उधार घ्यावयाचे धैर्य
जयाच्या मनी सदैव असतच नाही स्थैर्य

काळीज असणाऱ्यांचा काळोख दाटून उरतो
प्रेम हवे म्हणूनिया प्रेमाचा रोमरोम थरथरतो

त्या वेदनेला कुठून यावी ग्लानी शांततेची
काळजाला कला अवगत काळीज जोडण्याची.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस
का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस

वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत
अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत

नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो
कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो #शायरी

288 Views