Nojoto: Largest Storytelling Platform

कविता राहून गेली.. स्मरते अजुन आहे. शब्दांच्या ग

कविता राहून गेली..


स्मरते अजुन आहे.
शब्दांच्या गाठीभेटी
चांदीचे भरले दाणे
आळवाच्या नाजुक देठी

पोळणारे पाय माझे
उन्हातल्या आचेवरी
पावसाचे गहिरे डाग
जळलेल्या या त्वचेवरी

ओंजळीत सुगंधी आहे
अजुनी मोगरा टपोरा
तु कविता लिहायला दिलेला
कागद अजूनही कोरा


डोळ्यामधील आसवे मग
वाटांना पुसती खुशाली
दूरच्या प्रवासा द्यायची
ती कविता राहुन गेली.

- निशांत तेंडोलकर कविता राहून गेली
कविता राहून गेली..


स्मरते अजुन आहे.
शब्दांच्या गाठीभेटी
चांदीचे भरले दाणे
आळवाच्या नाजुक देठी

पोळणारे पाय माझे
उन्हातल्या आचेवरी
पावसाचे गहिरे डाग
जळलेल्या या त्वचेवरी

ओंजळीत सुगंधी आहे
अजुनी मोगरा टपोरा
तु कविता लिहायला दिलेला
कागद अजूनही कोरा


डोळ्यामधील आसवे मग
वाटांना पुसती खुशाली
दूरच्या प्रवासा द्यायची
ती कविता राहुन गेली.

- निशांत तेंडोलकर कविता राहून गेली