वाळवंटात विना चप्पल भर उन्हात चालतीय मी, पण हे त्रासदायक चालन ठरू नये कधी निकामी.. भेटत नाही पाण्याचा थेंब या तहानलेल्या जिवाला, हा जिव तर राहिलाय वाटत फक्त नावाला.. या अफाट वाळवंटात कुठवर असं चालावं, वेदनेच हे वादळ एकटीनेच कसं झेलावं.. पाण्याच्या आशेने भटकंतीय मी तिथं, वातावरणही देत हुलकावणी जिथं.. मनही देत आशांचे दाट-दाट धुके, पण शब्द मात्र माझे नेहमीच मुके.. # my thinking........