असं एका खोल काळ्या गर्द दरीच्या काठावर तुझी अन माझी भेट. अधांतरी जगताना खालचा काळोख तुझ्या विरहात किती बोंबा मारतोय तुला ऐकू येतंय का? ऐक ना... तू आणि मी काळोख झालो तर...? कोणालाही न दिसणार गर्द काळोख. असंख्य आवाजांचा, गुपितांचा आणि लोकांच्या भीतीदायक कुतूहलाचा विषय बनाव का आपण...? काळोखाच्या तोंडाला फासता येत असेल का माणसाचा बदनाम रंग? सांग ना...? #विदारकचित्र_जगण्याचं #फिरस्ती...❣️ मुक्तछंदी मी तिचा... प्रविणकुमार_पवार