आयुष्याच्या हिंदोळ्यावर सुखदुःखाचे झोके घेती नात्यांच्या नावेत बसुनी पैलतीरही सहज गाठती आईबाबा, भाऊ बहिणी जोडीला ती सहचारिणी बहरत जाते पानोपानी आयुष्याची बाग फुलोनी जाती दिवस, वर्षे संपुनी अन् एक दिवस जाई दिवा विझूनी.. सुप्रभात लेखकानों कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत. आयुष्य... प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या व्याख्या असतात,तुमच्याही असतील चला तर मग आजच्या कोलँब द्वारे मला सांगा. कविता,चारोळी,एकेरी दुहेरी,त्रिवेणी कुठलाही प्रकार चालेल पण आयुष्य हा शब्द यायला हवा. #आयुष्यहे #आयुष्य1 #आयुष्य