Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्रीण स्वप्नांनी मंतरलेल्या अनोळख

मैत्रीण

     स्वप्नांनी मंतरलेल्या 
        अनोळखी वाटेवर..,  
तू भेटलीस मला
                       एका निसरड्या वळणावर...

                         माझ्या अधीर, अशांत मनाला
                      शांततेचा किनारा लाभला..,
             निखळले बंध सारे अन्
.                                     तुझ्या माझ्या मैत्रीचा उत्सव सजला..

                          तुझं आभाळाएवढं स्मित हास्य
.                   जणू ऊर्जेचा वाहता झरा..,
                              गर्दीत माणसांच्या एकटा उभा मी
.                        तुझ्या दोस्तीने दिला सहारा...

                                  भासता मृगजळ रणरणत्या उन्हात
                                      तूच माझा आधार अन् तूच विसावा..,
             तुझा अबोला असा की
                                               जणू माझ्या काळजाचा ठोकाच चुकावा...

                               प्रामाणिकतेचं वरदान लाभलेल्या
                                            आरशासारख मला तुझ्या नजरेनं पाहिलं
                     माझ्या खोडकर चुकांना तू 
                     सहजतेने माफही केलं......

           मी तुझ्या सोबत आहे
                           असं तू जेव्हां जेव्हां म्हणतेस..
                      जग जिकल्यासारख वाटतं 
.                                   तेव्हा तू माझ्या सोबतच असतेस...

                                         आनंद, सहवास, विश्वास आणि आदर
                                               सारं काही जपलसं मर्यादेच्या अलीकडे..
                                           आता माझी हृदस्पंदने बोलू लागलीयेत
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???


~~                                                                सुधाकर फाळके #मैत्रीण
मैत्रीण

     स्वप्नांनी मंतरलेल्या 
        अनोळखी वाटेवर..,  
तू भेटलीस मला
                       एका निसरड्या वळणावर...

                         माझ्या अधीर, अशांत मनाला
                      शांततेचा किनारा लाभला..,
             निखळले बंध सारे अन्
.                                     तुझ्या माझ्या मैत्रीचा उत्सव सजला..

                          तुझं आभाळाएवढं स्मित हास्य
.                   जणू ऊर्जेचा वाहता झरा..,
                              गर्दीत माणसांच्या एकटा उभा मी
.                        तुझ्या दोस्तीने दिला सहारा...

                                  भासता मृगजळ रणरणत्या उन्हात
                                      तूच माझा आधार अन् तूच विसावा..,
             तुझा अबोला असा की
                                               जणू माझ्या काळजाचा ठोकाच चुकावा...

                               प्रामाणिकतेचं वरदान लाभलेल्या
                                            आरशासारख मला तुझ्या नजरेनं पाहिलं
                     माझ्या खोडकर चुकांना तू 
                     सहजतेने माफही केलं......

           मी तुझ्या सोबत आहे
                           असं तू जेव्हां जेव्हां म्हणतेस..
                      जग जिकल्यासारख वाटतं 
.                                   तेव्हा तू माझ्या सोबतच असतेस...

                                         आनंद, सहवास, विश्वास आणि आदर
                                               सारं काही जपलसं मर्यादेच्या अलीकडे..
                                           आता माझी हृदस्पंदने बोलू लागलीयेत
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???


~~                                                                सुधाकर फाळके #मैत्रीण