आली आली दिपावली दारी रंगांची रांगोळी लावू आकाश कंदील दीप तेज रोषणाई वसु बारस पहिली हळ्दी कुंकाचे औक्षण करू गोधनाची पूजा ओवाळूनी निरांजन पुढे धन त्रयोदशी धन्वंतरी पावो खास साऱ्या साऱ्या कुटुंबाला लाभो निरामय वास येता नर्क चतुर्दशी होते अभ्यंगाचे स्नान पाप वासनांचा नाश अहंकार उच्चाटन मग येई अमावस्या करू लक्ष्मीचे पूजन होवो धनधान्या वृध्दी मनोमनी हे चिंतन पुढे बली प्रतिपदा सुरू होते नववर्ष नव्या आशा नि आकांक्षा तन मना होई हर्ष भाऊबीज ती शेवटी भावा बहिणीचा थाट कशी बंधुशी ओवाळी चिंतूनिया प्रेमगाठ ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav #Diwali #दीपावली #kavita #कविता #Hinduism