Nojoto: Largest Storytelling Platform

Red sands and spectacular sandstone rock formation

Red sands and spectacular sandstone rock formations "तू माझी" असे अगदी दिमाखात मिरवताना,
तू लिहिलेल्या पत्रात "मी तुझा" नसताना..
तू वाचून दाखवतेस मला ते पत्र,
जे तू त्याच्यासाठी असतंस लिहिलेलं,
"मी गुलाब ठेऊ का चाफा",
हिरमुसलेल्या मोगऱ्याला विचारलेलं,
मी हताश आहे हे दिसू नये तुला साधं,
"पत्र पाठवण्याची गरज आहे का गं?"
माझ्या शेवटच्या प्रयत्नाला तू दिलेली बगल,
"ही कविता छान नाही, कर ना यात बदल",
तुझ्या त्याला तू देणाऱ्या पत्रात कविता माझी,
"तो नाही म्हंटला तर माझ्यासाठी होशील राजी?"
तू पुन्हा उत्तर टाळून माझा प्रश्न फिरवताना,
मी तरी तुझ्यासाठीच कविता गिरवताना 
"तू माझी" असे अगदी दिमाखात मिरवताना,
तू लिहिलेल्या पत्रात "मी तुझा" नसताना...

स्वप्नील हुद्दार 

.

©Swapnil Huddar #Sands