Nojoto: Largest Storytelling Platform

फ्रेंड सर्कल लेख (👇) वर्तुळ काढण्यासाठी कंपास का

फ्रेंड सर्कल लेख (👇) 
वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फिसकटलं. रियल लाईफ मध्ये असंच काहीसं झालं. वर्तुळ म्हणजे फ्रेंड सर्कल ज्यात म्हणे आपली जवळची माणसे असतात.मला वाटतं ,माझं वर्तुळ बहुतेक या कागदावरच्या वर्तुळासारखं मध्येच कुठेतरी फिसकटलं.फ्रेंड सर्कलच्या कडेला कुठेतरी तडा गेलेला असावा.तिथून म्हणायला अशी माझी माणसं मुंग्यांचा वारुळाचा मनोरा कोसळून मुंग्या भरभर बाहेर पडाव्या तशी बाहेर भुर्रकन निघून गेली.फ्रेंड सर्कलचं रूपांतर मग हळूहळू एका सरळ रेषेत झालं . या सरळ रेषेतून दोन्ही बाजूंनी बाहेर जाण्याचा स्कोप असतो.तसंच मी ही म्हणायला अशा आपल्या माणसांना, त्यांना जेव्हा हवं तेव्हा गरजेप्रमाणे निघून जाण्याचं स्वातंत्र्य दिलं.या सरळ रेषेचं रूपांतर एव्हाना केंद्रबिंदू म्हणजेच एक ठिपक्यामध्ये झालं आहे.
हा ठिपका, दुसरं तिसरं कोणी नसून मीच आहे.कुठलंही वर्तुळ पूर्ण न करण्याच्या अपेक्षेत आयुष्य जगत आहे,कदाचित त्या पृथ्वीसारखं...
--प्रेरणा
#yqtaai #yqtales #yqdidi #yqquotes #aestheticthoughts