Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो कवितेला छान ब

हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेला छान बोलणारी ती
कवितेत "मुक्त" रमणारी ती
काल कळले तिला यातून ऱ्हास होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

नजरेत शब्दस्नेह साठवणारी ती
बोलताना कविता आठवणारी ती 
आज कागद "कवीचा" बोचनारा होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कविते मागचा अर्थ कळणारी ती
कवितेच्या वळणावर वळणारी ती
वाटेवरच्या रस्त्यात मोठा महापूर येतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेचा उंची शोधणारी ती
भावनेची खोली मोजणारी ती
गर्तेत अभिमन्यू आजही एकटा राहतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

शब्दांकन - अक्षय साळवे

©Akshay Salve हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेला छान बोलणारी ती
कवितेत "मुक्त" रमणारी ती
काल कळले तिला यातून ऱ्हास होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

नजरेत शब्दस्नेह साठवणारी ती
बोलताना कविता आठवणारी ती 
आज कागद "कवीचा" बोचनारा होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कविते मागचा अर्थ कळणारी ती
कवितेच्या वळणावर वळणारी ती
वाटेवरच्या रस्त्यात मोठा महापूर येतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेचा उंची शोधणारी ती
भावनेची खोली मोजणारी ती
गर्तेत अभिमन्यू आजही एकटा राहतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

शब्दांकन - अक्षय साळवे

©Akshay Salve हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो
akshaysalve7004

Akshay Salve

New Creator