बेफाम उधाणलेला समुद्र, बेभान लाटा, सैरवैर गार वारा आणि हातात मऊ मुलायम तुझा हात.... साक्षीला पौर्णिमेची चंद्र, खिडकीखाली नक्षत्रांचा सडा पायी घेऊन उभा पारिजात, मंत्रमुग्ध रातराणीचा सुगंध आणि तुझ्या कमरेभोवती घट्ट माझा हात अन् बेधुंद राती दुलईवर चुरगळलेला मोगरा, बाहेर अंगणात पावसाची रिमझिम, अंगावर बरसणार्या सरी, चिंब चिंब भिजलेलो मी आणि हातात तुझा हात..... तुला काही आठवतयं...? निल इमरोझ निल इमरोझ