Nojoto: Largest Storytelling Platform

*कलियुगी पातकांचा* *भार दाटला भ

*कलियुगी पातकांचा* 
                  *भार दाटला भूवरी* 
       *आता धाव पांडुरंगा* 
                  *सोड भीमेची पायरी...* 

        *अग्निदिव्य रोज इथे* 
                 *सत्य,नीतीचे अघोरी* 
         *माथा उजळ फिरती* 
                *कूट, अनिती, लाचारी...* 

         *जो –तो आपली भाकरी* 
                *भाजण्यात आहे दंग* 
         *परउपकारा कोणी* 
               *गात नाही रे अभंग...* 

         *माय ,मातीचा लिलाव* 
               *किती दलाल पोसले* 
         *कुठं विकलं इमान?* 
                *तेज दानाचे लोपले...* 

      *आंधळ्या नि बहिऱ्यांची* 
               *वस्ती इथे दाटलेली* 
       *रंगा ,झेंड्यामध्ये तुझी* 
                *लेकरं रे वाटलेली...* 

        *बरबटलेले हात* 
              *मुख झाले ते मलीन* 
        *उतराई पुण्यायाची* 
              *कर पाप्यांचे क्षालन...*

©Shankar Kamble #Starss #कलियुग #पाप #पुण्य #जग #पांडूरंग #जगणं
*कलियुगी पातकांचा* 
                  *भार दाटला भूवरी* 
       *आता धाव पांडुरंगा* 
                  *सोड भीमेची पायरी...* 

        *अग्निदिव्य रोज इथे* 
                 *सत्य,नीतीचे अघोरी* 
         *माथा उजळ फिरती* 
                *कूट, अनिती, लाचारी...* 

         *जो –तो आपली भाकरी* 
                *भाजण्यात आहे दंग* 
         *परउपकारा कोणी* 
               *गात नाही रे अभंग...* 

         *माय ,मातीचा लिलाव* 
               *किती दलाल पोसले* 
         *कुठं विकलं इमान?* 
                *तेज दानाचे लोपले...* 

      *आंधळ्या नि बहिऱ्यांची* 
               *वस्ती इथे दाटलेली* 
       *रंगा ,झेंड्यामध्ये तुझी* 
                *लेकरं रे वाटलेली...* 

        *बरबटलेले हात* 
              *मुख झाले ते मलीन* 
        *उतराई पुण्यायाची* 
              *कर पाप्यांचे क्षालन...*

©Shankar Kamble #Starss #कलियुग #पाप #पुण्य #जग #पांडूरंग #जगणं