एकच आयुष्य आहे नशिबात आपल्या पुनर्जन्माचा विचार तू करू नको काहीही कर गं लोकं तर बोलतीलच चार दिवस तू मात्र जगाचा विचार करू नको... प्रेम केलंस तू कुठलीही चूक नाही यासाठी कधी स्वतःला दोष देऊ नको नातेवाईक,समाज,परिवार प्रवाहासारखे असते तू त्या स्वार्थी प्रवाहाचा विचार येऊ देऊ नको... आनंदात सोबत असतात संकटात एकटे पाडतात म्हणून तू स्वतःचा विचार करणं सोडू नको ह्या स्वार्थी लोकांच्या दुनियेत तू स्वतःचं मन मात्र कधीही मोडू नको... इतरांचे मेकअप करत असताना स्वतःचे अश्रू मात्र लपवू नको वाटलंच जर मनात काही तर कविता लिहून मोकळी हो पण मनातलं सांगण्यासाठी इथे कोणावर विश्वास ठेवू नको... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #silhouette