स्वातंत्र्याचा सूर्य उगवला स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तेज चहूकडे फाकले स्वातंत्र्याच्या या तेजाने विश्व सारे दिपले॥धृ॥ फळाफुलांनी नटली अवनी कृतार्थ झाली इथली जननी शेतकरी हा समर्थ झाला हरितक्रांतीने हे केले॥1॥ दुधातूपाची अवतरली गंगा कृतार्थ केले भारतीयांना गुरे वासरे नाचू लागली धवलक्रांतीने हे केले॥2॥ साक्षर झाली इथली जनता कृतार्थ झाली भारतमाता सिलीकाॅन व्हॅलीमध्ये जाऊनी संशोधन यांनी केले॥3॥ अमेरिकेने तंत्र न दिले हिंदपुत्राने स्वतःच मग महासंगणक बनवले माहिती तंत्रज्ञानाने हे केले॥4॥ कवी=महेश लोखंडे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला