कधी कधी मला कळतच नाही अचानक मी खूप खुश का असते ........? कधी कधी मला कळतच नाही त्याचे फोटो मी झूम करून का बघते.....? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या मेसेज ची मी वाट का बघते...... ? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या उशिरा येणाऱ्या मेसेज चा मला राग का येतो.....? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या न बोलण्याने मला इतका त्रास का होतो.......? कधी कधी मला कळतच नाही त्याच्या जवळ नसण्याने मी इतकी बैचेन का होते.......? कधी कधी मला कळतच नाही त्याने दुसरीकडे बघण्याने मला राग का येतो.......? कधी कधी मला कळतच नाही त्याचा टी शर्ट जपून ठेवण्यात मला कसला आनंद मिळतो.......? कधी कधी मला खरंच कळत नाही त्यानं दुसऱ्या कोणाशी बोलल्याने माझी चिडचिड का होते.........? ©Shailee Rodrigues कधी कधी #beingmarathi #marathistatus #marathimotivational #marathithoughts #poem #lovequote #marathi #nojoto #marathiquotes #marathi_premquotes