Nojoto: Largest Storytelling Platform

||श्री||

||श्री||
                                                                     प्रति, 
                                                                     अनुराग सोनवणे 
                 
स. न. वि.वि 
प्रिय अनुराग, 
पत्रास कारण की, आज तुझ्याशी काही बोलावस वाटतय. अनुराग तु नेहमी तुझ्याच विचारात गुंतलेला असतोस. आजकाल तु फारस कुणाशी बोलत नाही. सतत अबोल असतो समजल. याचे कारण मला माहीत आहे. तुझे विचार खुप जगावेगळे आहे. तु फक्त तुझ्याच दुनियेत रमलेला असतो. तुझ जग निस्वार्थी आहे. तु जरी खुप रागीट असला पण तुझ्या रागवण्यात मायेचा झरा नक्कीच असतो. पण तो कोणाला दिसत नाही हे मोठे तुझे दुर्दैव आहे. तुला समजून घेणारे कुणी नाही म्हणून तु गप्प असतो. कारण तुला समजायला समाज अजुन तेवढा समजदार नाही. तुला कौटुंबिक जबाबदारी कुणी सांगावी इतका तु असमजदार नक्कीच नाही. पण तुझ्या दोघेही पायात अडचणीच्या बेड्या आहेत हे अंधळ्या लोकांना दिसत नाही. पण एवढे मात्र नक्की की इतक्या साता समुद्राच्या संकटातून तु पैलतीरी येण्यासाठी तु दम टिकवून ठेवलायस याच खुप कौतुक आणि अभिमान वाटतो.  तु जन्माला आला तेव्हा पासूनच संकटांना  हरवतोय आणि त्यांना तु नेहमीच हरवशिल याची मला पूर्ण जाणीव आहे.

                                                                          तुझा प्रिय मित्र विश्वास माझे पत्र मलाच.