Nojoto: Largest Storytelling Platform

मला आज ही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस, १ली इयत्तेपा

मला आज ही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस,
१ली इयत्तेपासून १० वि इयत्तेपर्यंत मला नेहमी सकाळचीच शाळा असायची,
घरापासून साधारण १५/२० मिनिटाच्याआत मी शाळेत पोहोचायचो,तसा शाळेत मी एकटा कधी गेलोच नाही,नेहमी दादा (वडील) सोडायला यायचे,
त्या वेळेस इतक्या प्रमाणत गाड्या नव्हत्या जितक्यायाआज आहेत,मस्त रस्त्यांनी चालत मजा करत जायचो.
आमची शाळा म्हणजे एक चाळ होती,एक ऑफिस आणि तीन वर्ग,शाळेची चावी शाळेला लागून असलेल्या चाळीत एका काकांकडे राहायची.
मला सर्वात अगोदर शाळेत पोहोचायचे सवय होती त्यामुळे शाळेत पोहोचल्यावर त्या काकांकडून चावी घेऊन वर्ग मीच उघडायचो.
शाळेच्या पहिल्या दिवशी तर खूप वेगळाच आनंद यायचा नवीन मित्र क्वचितच असायचे, सर्व जुने मित्रच पास होऊन नवीन वर्गात यायचे,
वर्ग उघडल्यावर सर्व फळ्यावर स्वागत किंवा सुविचार लिहायची जबाबदारी माझी असायची,वर्ग उघडून झाल्यावर ऑफिस साफ करायचा बहाणा करून मी ऑफिस मध्ये सकाळ पेपर यायचा तो वाचायचो आणि शब्द कोडे सोडावयचो कारण गुरुजी येण्यास २० मिनिटे तरी लागायची.
खूप लिहायला आहे पण पाहिजे तितके आठवत नाही.
राहून फक्त एकच गोष्ट सांगता येते,
माझी शाळा मला खूप आवडायची आज ही आवडते
आज ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला मी न चुकता माझ्या शाळेत जातो.
शाळा सोडून आज २६/२७ वर्षे झाली पण त्या वेळेस चे काही वर्गमित्र आज ही सोबत आहेत
अधून-मधून आम्ही भेटतो सुध्दा,
खूप आनंद होतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे 26 जुन.
या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा.
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा.
आणि तुमची शाळा कधी सुरु व्हायची ते सांगा.
#शाळेचापहिलादिवस 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine