#देह कुडी एक रंग.... देह कुडी एक रंग जयास असे तयास विठ्ठलरूपी आत्म्याचाही संग हाडामासाचा तिथं पिंजरा केला आत सुंदर राघु बैसविला राघु मोठा ग्यानी ज्ञानी बोली बोले मंजुळ वाणी एके समयी अनाहूतपणे राघु उडूनिया दुरदेशी गेला तयाचा पिंजरा मग मातीत लोटला चार घटका तयाचिया नामाचा शोक आप्तांनी केला काळाच्या पडद्याआड कुडीचा पिंजरा जव लोटला तव प्रत्येकजण तयास विसरूनी तयामागे उरलेल्या संपत्तीवर तुटुनिया पडला जन्मा जो येणार तो एक दिवस भाग्यरेषेच्या भाकीतावर मरणासही सामोरं गेला तयामागे कुणीच फार शोक ना केला कुडीतुन पंचप्राण जाण्याच्या काही क्षणभरातच माघारी उरलेल्यांनी तयाच्या संपत्तीचा लोभ धरावा अन् रागरुसवा करावा हाच मग नवा पायंडा पडला @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #देह_कुडी_एक_रंग_जयास