Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा मनुस्मृतीने नाकारला होता माणुसकीचा हात ते

जेव्हा मनुस्मृतीने नाकारला होता 
माणुसकीचा हात 
तेव्हा त्या महामानवाने दिली
होती साथ
त्या महामानवाला मी वंदन करतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
शिक्षणाची आवड त्याला स्वस्थ
बसू देत नव्हती
पुस्तकं हातात पडली की त्याला 
वेळ दिसत नव्हती
त्याचीच कथा आज तुला सांगतो 
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
लहान वयातच त्याला अस्पृश्यतेचे 
चटके बसले 
समाजसुधारणेची जाण ठेवून सगळे 
गुपचूप सोसले 
त्याच्याच संघर्षाची गाथा तुला सांगतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
शिक्षणाच्या साथीनं जिवाचं 
रान केलं 
दलितांच्या गळ्यात ल मडक त्यानेच
तर भिरकावून दिलं
हाच भीमपराक्रम मी तुझ्यासमोर मांडतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
त्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज सन्मानाने जगतोय
त्याने लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण
देश चालतोय
याच महामानवाच्या जयंती च तुला आमंत्रण देतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो

©Shruti Kurane
  #humanism